इंग्लंडचा क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठा विजय

इंग्लंडचा फलंदाज एलेक्स हेल्सने 133 धावा आणि जेसन रॉयनं 112 धावांची खेळी करुन लंकेवर सहज विजय मिळवला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
इंग्लंडच्या क्रिकेट इतिहासात असं दुसऱ्यांदा घडलं आहे की त्यांच्या दोन्ही सलामीवीरांनी शतक ठोकलं. याआधी दक्षिण आफ्रिकेविरोधात ट्रेस्कॉथिक आणि सोलंकी यांनी शतक ठोकलं होतं.

इंग्लंडच्या वनडे क्रिकेट इतिहासातील ही सर्वात मोठी भागीदारी ठरली आहे. एलेक्स हेल्स आणि जेसन रॉय यांनी 256 धावांची भागीदारी केली. याआधी अँड्र्यू स्ट्रॉस आणि जोनाथन ट्रॉटनं 250 धावांची भागीदारी केली होती.
धावांचा पाठलाग करताना एकही गडी न गमावता मिळवलेला हा सर्वात मोठा विजय आहे. याआधी 2015 मध्ये न्यूझीलंडनं झिम्बाब्वेविरुद्ध 236 धावांचं आव्हान एकही गडी न गमवता पार केलं होतं.
इंग्लंडनं दुसऱ्या वनडेत लंकेवर 10 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 254 धावा केल्या होत्या. इंग्लंडनं 255 धावांचं आव्हान एक गडी न गमवता सहज पार केलं. या मोठ्या विजयानं अनेक नवे विक्रम रचले गेले आहेत.
काल रात्री इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात खेळविण्यात आलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात इंग्लंडनं लंकेचा फारच दारुण पराभव केला. हा पराभव लंकेच्याही बराच जिव्हारी लागला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -