विंडीजवर मात अन् टीम इंडियानं पाकला टाकलं मागे!
एबीपी माझा वेब टीम | 25 Jul 2016 12:55 PM (IST)
1
कसोटीत सर्वात जास्त ऑस्ट्रेलियानं विजय मिळवले आहेत. ऑस्ट्रेलियानं 372 विजय मिळवले आहेत तर त्यांना 208 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.
2
टीम इंडियानं 496 कसोटींपैकी 128 कसोटीत विजय मिळवला आहे. तर 157 सामन्यात पराभव आणि 210 कसोटी अनिर्णित.
3
पाकिस्तानी क्रिकेट टीमने 127 कसोटी विजय मिळवले आहेत. सध्या पाकिस्तान इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे.
4
वेस्टइंडिज विरुद्ध खेळणाऱ्या चार सामन्याच्या मालिकेत टीम इंडियानं पहिल्या कसोटीत दणदणीत विजय मिळवला. भारताचा कसोटीतीला हा आजवरचा 128वा विजय आहे. या विजयानं भारत पाकच्याही पुढं गेलं आहे.
5
6
टीम इंडियाचा स्टार गोलंदाज रविचंद्रन अश्विनच्या (83-7) फिरकी गोलंदाजीच्या मदतीनं वेस्टइंडिज विरुद्धची पहिली कसोटी एक डाव आणि 92 धावांनी जिकंली.