कर्णधार कूकच्या सचिन, द्रविड, पॉन्टिंगपेक्षाही वेगवान 11 हजार धावा
कूक सध्या 31 वर्षांचा आहे. त्यामुळे तो क्रिकेटमधील अनेक विक्रम मोडण्याची शक्यता आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकूकशिवाय सचिन तेंडुलकर, पॉन्टिंग, कॅलिस, द्रविड, संगकारा, लारा, चंद्रपॉल, जयवर्धने आणि बॉर्डर यांचा समावेश आहे.
कूकनं कसोटी क्रिकेटमध्ये तब्बल 11हजार धावा पूर्ण केल्या आहेत. कसोटीत 11 हजार धावा करणारा तो 10वा फलंदाज ठरला आहे. पण 11 धावा त्यानं सर्वाधिक कमी वेळेत पूर्ण केले आहेत. कूकनं 10 वर्ष 290 दिवसात या 11 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. त्याच्याआधी कोणत्याही फलंदाजानं 11 हजार धावा इतक्या कमी वेळात केलेल्या नाही.
कर्णधार कूक अवघ्या 10 धावांवर बाद झाला. पण त्याआधी त्यानं एक मोठा विक्रम रचला.
भारत आणि इंग्लडमध्ये चेन्नईत खेळविण्यात पाचव्या कसोटीत इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडच्या दोन्ही सलामीवीरांना स्वस्तात बाद केलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -