विराटचा नवा विक्रम, सेहवाग-सचिनला टाकलं मागे!
एबीपी माझा वेब टीम | 18 Nov 2016 11:34 AM (IST)
1
यानंतर पॉली उम्रीगर आणि पुजारानं 40 कसोटीत 10 शतकं ठोकली.
2
सचिन तेंडुलकरनं आणि मोहम्मद अझररुद्दीनं 50 कसोटीत 11 शतकं ठोकली होती.
3
वीरेंद्र सेहवागनं 50 कसोटीत 12 शतकं ठोकली होती.
4
50 कसोटी खेळणाऱ्या विराटनं 14 शतकं ठोकली असून तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर गावसकर हे पहिल्या क्रमांकावर आहेत.
5
पण या सामन्यात विराटनं एक नवा विक्रम रचला. सुनील गावसकर वगळता विराटनं मोठ्या फलंदाजांना पाठी टाकलं.
6
50वी कसोटी खेळत असलेल्या विराटनं 14 शतकं ठोकली आहेत. त्यानं पुजाराच्या साथीनं 226 धावांची भागीदारी रचली.
7
इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीत कर्णधार विराट कोहली आणि पुजारानं शानदार शतकं ठोकली. विराटचे हे कसोटी कारकिर्दीतील 14वं शतक होतं.