राहुलने सेहवागचा 10 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडला
या सामन्यात के एल राहुलने 47 चेंडूत 71 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने 8 चौकार आणि 2 षटकार ठोकले. या खेळीने राहुलने वीरेंद्र सेहवागचा विक्रम मोडत, टॉपवर पोहोचला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरहाणेनंतर सिक्सर किंग युवराज सिंहचा नंबर लागतो. युवराजने इंग्लंडविरुद्ध सलग सहा षटकार ठोकत 58 धावा ठोकल्या होत्या.
राहुल आणि सेहवागनंतर या यादीत कर्णधार विराट कोहलीचा नंबर लागतो. कोहलीने 2014 मध्ये इंग्लंडविरुद्ध 66 धावा केल्या होत्या.
टी 20 सामन्यात इंग्लंडविरुद्ध भारताकडून सर्वाधिक धावांचा विक्रम सेहवागच्या नावावर होता. सेहवागने 2007 च्या टी ट्वेण्टी वर्ल्डकपमध्ये इंग्लंडविरुद्ध 68 धावा केल्या होत्या. सेहवागच्या या धावांचा विक्रम मोडत राहुलने 71 धावा केल्या.
युवराजशिवाय गौतम गंभीरनेही 2007 च्या टी ट्वेण्टी वर्ल्डकपमध्ये 58 धावा केल्या होत्या.
के एल राहुलचं झटपट अर्धशतक, बुमराह आणि आशिष नेहरा यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर, भारताने दुसऱ्या टी ट्वेण्टी सामन्यात इंग्लंडवर 5 धावांनी सनसनाटी विजय मिळवला.
या यादीत अजिंक्य रहाणे चौथ्या स्थानावर आहे. रहाणेने 2011 मध्ये मँचेस्टरच्या मैदनावर 61 धावा ठोकल्या होत्या.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -