अश्विननं गावसकर-द्रविडलाही टाकलं मागे, रचला नवा विक्रम
गावसकरांनंतर या यादीत राहुल द्रविडचा नंबर लागतो. द्रविडनं वेस्ट इंडिजविरुद्ध 38 डावात 63.80च्या सरासरीनं धावा केल्या आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाल खेळलेल्या 75 धावांच्या खेळीनं अश्विन सुनील गावसकरांच्या पुढे गेला आहे. गावसकरांनी वेस्ट इंडिजविरुद्ध 65.45च्या सरासरीनं धावा केल्या आहेत. दरम्यान, गावसकरांनी वेस्ट इंडिजविरुद्ध 48 डावात फलंदाजी केली होती.
अश्विननं वेस्ट इंडिजविरुद्ध खेळताना 9 डावात 66.57च्या सरासरीनं 466 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये त्याची 124 धावांची सर्वोत्तम खेळी आहे.
इतकंच नव्हे, अश्विननं वेस्ट इंडिजविरुद्ध 66.57च्या सरासरीनं धावा केल्या आहेत.
या मालिकेत अश्विननं आतापर्यंत 191 धावा केल्या आहेत. त्याच्यापुढे विराट कोहली (247) आणि केएल राहुल (208) हे दोनच फलंदाज आहेत.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात रविचंद्रन अश्विन (नाबाद 75) आणि विकेटकिपर रिद्धिमान साहा (नाबाद 46) यांच्या भागीदारीच्या जोरावर 234 धावांपर्यंत मजल मारली आहे. 100 धावांवर 4 गडी बाद झाल्यानंतर टीम इंडिया चांगलीच अडचणीत सापडली होती. मात्र, अश्विननं 190 चेंडूंचा सामना करत भारताचा डाव सावरला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -