विजयासह विराटनं रचला नवा विक्रम!
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया पहिल्यांदाच वेस्टइंडिज दौऱ्यावर कसोटी मालिकेसाठी रवाना झाली होती. या मालिकेत वेस्टइंडिजला अद्याप एकही विजय मिळवता आला नाही. मालिकेतील एक कसोटी अजूनही शिल्लक आहे. त्यामुळे शेवटची कसोटी जिंकून मालिकेचा शेवट गोड करण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appटीम इंडियानं या मालिकेतील पहिली कसोटी 1 डाव आणि 92 धावांनी जिंकली होती. तर पावसामुळे दुसरी कसोटी अनिर्णित राहिली होती.
वेस्टइंडिजमध्ये जाऊन एकाच मालिकेत 2 कसोटी जिकंण्याची किमया टीम इंडियानं साधली आहे. याआधी असा विक्रम भारतीय संघाला करता आला नव्हता.
68 वर्षामध्ये भारत-वेस्टइंडिज इतिहासात भल्याभल्या कर्णधारांना जे जमलं नाही ते विराटनं करुन दाखवलं.
टीम इंडियानं तिसऱ्या कसोटीत वेस्टइंडिजचा 237 धावांच्या मोठ्या फरकानं पराभव केला. चार सामन्यांच्या मालिकेत भारतानं 2-0 बढत घेतली आहे. या मालिका विजयानं टीम इंडिया आणि विराट कोहलीनं एक मोठा कारनामा केला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -