✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

जाडेजाच्या पत्नीला पोलिसाची मारहाण

एबीपी माझा वेब टीम   |  22 May 2018 08:01 AM (IST)
1

दरम्यान, रीवाबाचा पती रवींद्र जाडेजा सध्या आयपीएलमध्ये व्यस्त आहे. जाडेजाच्या चेन्नई सुपर किंग्जने प्लेऑफमध्ये धडक मारली आहे. सध्या जाडेजा मुंबईत आहे.

2

टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाच्या पत्नीला मारहाण झाली आहे. गुजरातमधील जामनगर इथे पोलिसांकडूनच जाडेजाची पत्नी रीवाबा जाडेजाला मारहाण झाली. रीवाबाच्या कारची पोलिसाच्या दुचाकीला धडक बसली. त्या वादातून पोलिसाने सर्वांसमोर भररस्त्यात मारहाण केली.

3

मारहाण करणाऱ्या पोलीस हवालदाराला निलंबित करण्यात आलं आहे. संजय अहिर असं आरोपी पोलिसाचं नाव आहे.

4

17 एप्रिल, 2016 रोजी राजकोटमध्ये रवींद्र जाडेजा आणि रिवाबा सोळंकी यांचा शाही विवाह झाला. जून 2017 मध्ये त्यांना कन्यारत्न झालं. आपल्या गोंडस मुलीचं नाव त्यांनी निध्याना (Nidhyana) ठेवलं आहे.

5

ज्यावेळी रीवाबाच्या कारची पोलिसाच्या गाडीला धडक बसली, त्यावेळी पोलिस गणवेशात नव्हता. मात्र या अपघातात रीवाबाला किरकोळ दुखापत झाली आहे. हा अपघात पोलीस मुख्यालयाजवळच घडल्याने, हे प्रकरण तातडीने पोलिस स्टेशनमध्ये पोहोचलं. एसपी ऑफिसमध्ये रीवावर प्रथमोपचार करण्यात आले.

6

महत्त्वाचं म्हणजे मारहाणीचा हा प्रकार पोलीस मुख्यालयाजवळच घडला. या घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये रस्त्याच्या कडेला रीवाबा आणि पोलीसामध्ये वाद सुरु असल्याचं दिसतं. याप्रकरणी कॉन्स्टेबल संजय अहिरला ताब्यात घेण्यात आलं आहे.

7

महिलेला पोलिसाने मारहाण करणं अत्यंत गंभीर असल्याचं, जामनगरचे पोलीस अधीक्षक प्रदीप शेजुल यांनी म्हटलं आहे. तसंच आरोपी पोलिसावर कडक कारवाई करु, असंही त्यांनी म्हटलं आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • जाडेजाच्या पत्नीला पोलिसाची मारहाण
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.