निसर्गाची अद्भूत जादू... कोकणातल्या समुद्रकिनाऱ्यावरची निळाई!

(फोटो सौजन्य: केदार सावंत)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
निसर्गाची अद्भूत जादू (फोटो सौजन्य: केदार सावंत)

छायाचित्रकार केदार सावंत यांनी समुद्रकिनाऱ्यासोबतच काढलेले इतरही काही खास फोटो (फोटो सौजन्य: केदार सावंत)
तेव्हा निसर्गाच्या या जादूचा तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर तुम्हाला कोकण गाठून एक रात्र समुद्रकिनाऱ्यावर घालवावी लागेल. (फोटो सौजन्य: केदार सावंत)
समुद्राच्या पाण्याबरोबर हे सूक्ष्म प्लवंग किनाऱ्यावर येतात आणि जेव्हा ते एखाद्या गोष्टीच्या संपर्कात येतात तेव्हा प्रकाशमान होतात. या प्राण्यामध्ये जैविक प्रकाश निर्माण करण्याची क्षमता असते. (फोटो सौजन्य: केदार सावंत)
स्थानिक मच्छिमार याला पाणी पेटले किंवा जाळ असं म्हणतात. मात्र समुद्र किनाऱ्याला निळी झालर प्राप्त करून देणारे हे जीव प्लवंग असून त्यांना शास्त्रीय भाषेत नॉकटील्युका असं म्हणतात. (फोटो सौजन्य: केदार सावंत)
हे फोटो काही कॉम्प्युटर ग्राफिक्सच्या मदतीनं तयार करण्यात आलेले नाही. तर गणपतीपुळे जवळच्या आरेवारे गावातल्या समुद्रकिनाऱ्यावरचे आहेत. (फोटो सौजन्य: केदार सावंत)
सध्या रत्नागिरीची किनारपट्टी अद्भुत अशा निळाशार रंगानं झळाळून उठते आहे. रात्रीच्या वेळी किनारपट्टीवर निळ्या रंगाच्या लाटा उसळताना स्पष्ट दिसत आहेत. (फोटो सौजन्य: केदार सावंत)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -