राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डनमध्ये फुलांचा मनमोहक गालिचा
6 फेब्रुवारीपासून 10 मार्च 2019 पर्यंत सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 4 पर्यंत हे गार्डन चालू असेल.
विविध रंगातील 10,000 ट्यूलिप जातीची फुलं पाहायला मिळतील. सोबतच मुघल गार्डनमध्ये जवळजवळ 137 प्रकारची गुलाबाची फुलं दिसून येतील.
याव्यतिरिक्त मोगरा, रजनीगंधा, बेला, रातराणी, चंपा-चमेली सारखी अनेक प्रजातींची फुलं आसपास पाहायला मिळतील.
6 फेब्रुवारीपासून 10 फेब्रुवारीपर्यंत पर्यटकांना 70 प्रकारची वेगवेगळी फुलं पाहायला मिळणार आहेत. यात जपान आणि नेदरलॅंडवरुन आणली गेलेली फुलं पाहायला मिळतील. यावेळी सजावट करण्यात आलेल्या फुलांचा रंग पिवळा, सफेद आणि लाल आहे.
या मुघल गार्डनला स्पिरिचुअल गार्डन म्हटलं तरी हरकत नाही, कारण इथे चंदन, बेर, रुद्राक्ष, खजूर, क्रिसमस-ट्री, कल्पवृक्ष, खैर यासारख्या औषधी वनस्पतींचादेखील समावेश आहे.
राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डन आज खुलं करण्यात आलं आहे. 6 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारीपर्यंत सामान्यांना हे गार्डन पाहता येणार आहे. निरनिराळ्या रंगांची आणि जातींची फुलं इथे पाहायला मिळतील, मात्र ऑरेंज ट्युलिप यंदांचं प्रमुख आकर्षण ठरणार आहे.