बर्थ डे स्पेशल : ...म्हणून रणवीर सिंह पूर्ण नाव लावत नाही
आयफा 2016 पुरस्कार सोहळा रणवीर सिंह आणि दीपिका पादूकोण यांच्यासाठी खास ठरला. रणवीरला 'बाजीराव मस्तानीसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता तर दीपिकाला 'पीकू'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळला.
रणवीर सिंहने त्याच्या नावातून भावनानी शब्द हटवला. कारण नाव खूप मोठं आहे आणि सिनेसृष्टीत या नावासह त्याला महत्त्व मिळालं नसतं, असं त्याला वाटत होतं.
रणवीर लहानपणी जाड होता. मात्र वयाच्या 16 व्या वर्षापासून त्याने वजन कमी करण्यासाठी सुरुवात केली. योग्य जेवण, चांगली झोप आणि कठोर मेहनत हा रणवीरचा फिटनेस फंडा आहे.
रणवीर सिंहचा जन्म 6 जुलै, 1985 रोजी मुंबईतील सिंधी कुटुंबात झाला. रणवीरच्या वडिलांचं नाव जगजीत सिंह भावनानी, आईचं नाव अंजू भावनानी आणि मोठी बहिण रितिका भावनानी आहे. रणवीरचे वडील वांद्यातील रिअल स्टेटचे व्यापारी आहेत. तर त्याची आई गृहिणी आहे. बॉलिवूडचा हा डॅशिंग अभिनेता स्वत:ला 'मम्माज बॉय' म्हणतो. 'लुटेरा' प्रदर्शित होण्यआधी रणवीरने त्याच्या आईला एक महागडी गाडी गिफ्ट म्हणून दिली होती.
रणवीरने 2010 मध्ये यशराज फिल्म्सच्या 'बँड बाजा बारात'साठी ऑडिशन दिलं आणि त्याची निवडही झाली. या सिनेमासाठी त्याला पदार्पणातील सर्वोत्कृष्ट अभिनेता फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.
आतापर्यंत रणवीरचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं आहे. सध्या दीपिका आणि तो रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे. त्याआधी अनुष्का शर्मा आणि हेमा मालिनी यांची लहान मुलगी आहना देओलसोबतही जोडलं गेलं आहे. सिनेमात पदार्पण करण्यापूर्वी त्याचं नाव आहनासोबत जोडलं होतं.