अखेर सलमानच्या 'त्या' विधानावर रणबीरने मौन सोडलं
पॅरिसमध्ये सुलतानच्या स्क्रिनींगमध्ये रणबीरने बेबी को बेस पसंद हैं या गाण्यावर जोरदार डान्स केला होता. प्रेक्षकांनी या गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता.
आज मी येथे 'मदारी'साठी आलो आहे, त्यामुळे दुसऱ्या सिनेमाविषयी न बोललेलंच बरं राहील, अशी विनम्र प्रतिक्रिया रणबीरने दिली.
रणबीरने सलमानच्या या प्रतिक्रेयेवर मौन सोडलं आहे. इरफान खानच्या 'मदारी' सिनेमाच्या खास स्क्रिनींगला रणबीरने हजेरी लावली. त्यावेळी रणबीरला यावर विचारणा करण्यात आली.
रणबीरच्या डान्सचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ सलमाननेही पाहिला.
रणबीर डान्स नाही करत, तर सिनेमावरुन प्रेक्षकांचं लक्ष विचलीत करत आहे. आपण त्याच्या डोक्यात खुर्ची घालणार आहोत, अशा शब्दात सलमानने राग व्यक्त केला होता.
सलमान खानच्या 'सुलतान' सिनेमाच्या स्क्रिनींगमध्ये अभिनेता रणबीर सिंहने डान्स केला होता. यावर सलमानने नाराजी व्यक्त केली होती.