ऐश्वर्यावरील 'त्या' विधानावर रणबीरचं स्पष्टीकरण
'ऐ दिल है मुश्किल' सिनेमात योगदान दिल्यामुळे आपण ऐश्वर्याचे नेहमी आभारी राहू. असं काही बोलून ऐश्वर्याचा अपमान करण्याचा विचारही कधी मनात येणार नाही, असं स्पष्टीकरण रणबीरने दिलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसहजरित्या केलेल्या विधानाला सणसणाटीपणाने सादर केल्याने आपल्याला दुःख झालं असल्याचं रणबीर म्हणाला.
ऐश्वर्या एक महान अभिनेत्रींपैकी एक आहे. आमचे कौटुंबिक संबंध आहेत, असं रणबीरने सांगितलं.
ऐश्वर्या तसं म्हणाल्यानंतर अशी संधी परत मिळणार नाही, असा विचार मनात आला आणि आपणही संधीचं सोनं केलं, असं विधान रणबीरने सहजरित्या केलं होतं. मात्र याला चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आलं. त्यावर आता रणबीरने स्पष्टीकरण दिलं आहे.
हात थरथरायला लागल्यानंतर ऐश्वर्याने स्वतःच एक कलाकार म्हणून सर्व सीन करायला सांगितले, असं रणबीर म्हणाला होता.
ऐश्वर्यासोबत बोल्ड सीन शूट करताना आपल्याला लाज वाटत होती आणि हात थरथरत होते. त्यामुळे ऐश्वर्याच्या गालाला हात लावताना देखील संकोच वाटत होता, असं विधान रणबीरने केलं होतं.
अभिनेता रणबीर कपूरने एक मुलाखतीत 'ऐ दिल है मुश्किल' सिनेमातील ऐश्वर्या राय बच्चनसोबतच्या बोल्ड सीनबाबत विधान केलं होतं. त्यानंतर या विधानावरुन नवा वाद उभा राहिला. त्यावर आता रणबीरने स्पष्टीकरण दिलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -