ऐशोआरामात राहणारा राम रहीम जेलमध्ये 'हे' काम करणार!
राम रहीमने जेलमध्ये कैद्यांना मिळणारा गणवेश अजून परिधान केलेला नाही. रक्तदाब आणि छातीत दुखत असल्याच्या तक्रारीनंतर त्याला फळं दिली जात आहेत.
दोन दिवस तुरुंगात घालवल्यानंतर राम रहीमने जेवणच्या दर्जाविषयी तक्रार करण्यास सुरुवात केली आहे. इतकंच नाही तर जेलच्या कॅन्टीनमध्ये मिळणारं मिनरल वॉटरच तो पितो.
राम रहीमच्या किंगसाईज बेड आणि वेल्वेटच्या पांघरुणाची जागा आता कापसाची गादी आणि खडबडीत पांघरुणाने घेतली आहे.
काही वृत्तानुसार, बलात्कारी बाबा कोठडीच्या भिंतींशी बोलतो. तर दिवसातील बराच वेळ तो मेडिटेशन करण्यातच घालवतो.
राम रहीम लवकरच तुरुंगात माळी काम करताना दिसेल. यासाठी त्याला दिवसाला 40 रुपये मिळणार आहेत.
साध्वीवरील बलात्कारप्रकरणी दोषी ठरलेला डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम राहीम रोहतकच्या जेलमध्ये कैद आहे. बलात्कारप्रकरणी त्याला 20 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. एकेकाळी ऐशोआरामात आयुष्य जगणारा राम रहीम कोर्टाच्या निकालानंतर सध्या 8 बाय 8 च्या कोठडीत शिक्षा भोगत आहे.