राजू शेट्टी यांची किसान मुक्ती यात्रा
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदिल्लीत पोहोचल्यानंतर 18 जुलै रोजी जंतरमंतरवर देशभरातील शेतकऱ्यांनी एकत्र यावं असं आवाहन खासदार राजू शेट्टींनी केलं आहे.
मध्यप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाणा या राज्यांमधून प्रवास करत ही यात्रा संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला दिल्लीत पोहणार आहे.
शेती मालाला योग्य भाव आणि शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावरुन राजू शेट्टींनी किसान मुक्तीयात्रा काढली आहे.
तणाव वाढू नये यासाठी पोलिसांनी शेतकरी संघर्ष समितीचे स्थानिक नेते आणि माजी आमदार डॉ. सुनिलम यांना अटक केली आहे. सध्या इथं 600 पोलिसांचा बंदोबस्त आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली देश पातळीवरील किसना मुक्ती यात्रेला मध्यप्रदेशातल्या बुढामधून सुरुवात झाली आहे. या यात्रेत राजू शेट्टींसह सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, योगेंद्र यादव यांच्यासह 25 राज्यातले शेतकरी सहभागी झाले आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -