नौदलाचं बळ वाढणार, आयएनएस खंदेरी पाणबुडीचा ताफ्यात समावेश
28 सप्टेंबर रोजी गृहमंत्री राजनाथसिंह या पाणबुडीचं अनावरण करणार आहेत
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदुसऱ्या स्कॉर्पिन प्रकारातील पाणबुडी असलेल्या आयएनएस खंदेरीचे नुकतेच भारतीय नौदलाकडे हस्तांतरण करण्यात आले आहे.
याअगोदर या प्रकारातली पहिली पाणबुडी आयएनएस कलावरी चार वर्षांपूर्वी मुंबईत नौदलाच्या सेवेत दाखल झाली आहे. तर आता आयएनएस खंदेरीचादेखील मुंबईत नौदलाच्या ताफ्यात समावेश करण्यात आला आहे.
आयएनएस खंदेरी 350 मीटर खोल समुद्रात जाऊन शत्रूची माहिती मिळवू शकते. या पाणबुडीचा वेग 22 नोट्स म्हणजेच 40 किलोमीटर प्रतितास इतका
या पाणबुडीची लांबी 67.5 मीटर आणि उंची 12.3 मीटर इतकी आहे. या पाणबुडीचं वजन एक हजार 565 टन इतकं आहे. ही पाणबुडी तब्बल 45 दिवस पाण्यात राहू शकते.
आएनएस खंदेरी ही दुसऱ्या श्रेणीतील कलावरी सबमरीन म्हणजेच पाणबुडी आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -