अक्षय कुमार आणि रजनीकांतचा सिनेमा '2.0'चं पोस्टर लाँच
एबीपी माझा वेब टीम | 17 Nov 2016 01:27 PM (IST)
1
या सिनेमात अक्षय कुमार वेगळ्याच लूकमध्ये दिसून येणार आहे.
2
या सिनेमात अक्षय कुमार, एमी जॅक्सन, सुधांशु पांडे यांच्या सारखे कलाकार असणार आहेत. तर या सिनेमातील गाण्यांना संगीत ऑस्कर पुरस्कार विजेता ए. आर. रेहमाननं दिलं आहे.
3
2010मधील तामिळ सिनेमा 'एंथीराम'चा '2.0' हा सिक्वेल असणार आहे. कथित माहितीनुसार, या सिनेमाचा बजेट तब्बल 350 कोटी असणार आहे.
4
सिनेनिर्माता करण जोहर रविवारी या सिनेमाचा पहिला लूक रिलीज करेल.
5
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि सुपरस्टार रजनीकांत यांचा आगामी सिनेमा '2.0'चं पहिलं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. तसंच अशीही घोषणा करण्यात आली आहे की, या सिनेमाचा पहिला लूक रविवारी रिलीज करण्यात येणार आहे.