चंदगडच्या लाल मातीत वीर विसावला
काश्मीरच्या पूँछ भागात शहीद झालेले जवान राजेंद्र तुपारे अनंतात विलीन झाले. चंदगड तालुक्यातील कारवे गावात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. नऊ वर्षाचा मुलगा आर्यनने त्यांना भडाग्नी दिला. लष्करी इतमामात शहीद राजेंद्र तुपारेंना अखेरचा निरोप देण्यात आला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगावच्या वीरपुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी पंचक्रोशी लोटली होती. अभिमानाचा हुंदका, आठवणींचे अश्रू आणि लष्कराच्या सलामी देणाऱ्या बिगुलाचा अंगावर काटा आणणारा नाद, यासह महाराष्ट्राचा वीरपुत्र अनंतात विलीन झाला.
राजेंद्र तुपारे यांनी 14 वर्षे भारतमातेची सेवा केली, मात्र रविवारी 6 नोव्हेंबरला शत्रूशी लढताना त्यांना वीरमरण आलं. राजेंद्र तुपारे यांच्या पश्चात पत्नी, दोन आर्यन (वय 9 वर्षे) आणि वैभव (वय 5 वर्षे) अशी दोन मुलं आणि आई-वडील आहेत.
राजेंद्र तुपारेंच्या अंत्यदर्शनासाठी कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, चंदगडच्या आमदार संध्यादेवी कुपेकर, आमदार अमल महाडिक, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे उपस्थित होते.
राज्य सरकारने शहीद राजेंद्र तुपारे यांच्या कुटुंबीयांना 15 लाख रुपयांची मदत जाहीर केली. शहीद राजेंद्र तुपारे यांच्या बलिदानानं अवघ्या कोल्हापूर जिल्ह्यावर शोककळा पसरली.
‘अमर रहे, अमर रहे, राजेंद्र तुपारे अमर रहे’, भारत माता की जय यासारख्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -