✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

अमित ठाकरेंना बिग बींकडून मौल्यवान रिटर्न गिफ्ट!

एबीपी माझा वेब टीम   |  17 Oct 2016 03:48 PM (IST)
1

राज ठाकरे यांनी उशिराच अमिताभ बच्चन यांच्या 74 व्या वाढदिवसानिमित्त गिफ्ट दिलं. हे गिफ्ट म्हणजे राज ठाकरे यांनी स्वत: रेखाटलेलं बिग बी याचं स्केच. हे स्केच अमित ठाकरे यांनीच अमिताभ यांना 'जलसा' बंगल्यावर जाऊन दिलं. इतकंच नाही तर आवडत्या अभिनेत्यासोबत दोन तास बोलण्याची संधीही त्यांना मिळाली.

2

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे सध्या भलत्याच खुशीत आहेत. या आनंदामागचं कारणही मोठं आहे. कारण बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी वाढदिवसाचं रिटर्न गिफ्ट म्हणून अमित ठाकरेंना चक्क त्यांचं लकी घड्याळ दिलं.

3

अमिताभ बच्चन यांना घड्याळांचं कलेक्शन करण्याचा छंद असल्याचं अमितने वाचलं होतं. शिवाय त्याला रिटर्न गिफ्ट म्हणून दिलेलं घड्याळ बिग बी यांनी लंडनमधून खूप वर्षांपूर्वी खरेदी केलं होतं. मात्र राज ठाकरेंच्या 'कृष्णकुंज' बंगल्यावर अमिताभ यांच्याकडून रिटर्न गिफ्ट म्हणून आलेलं घड्याळ पाहून आम्ही सगळेच आश्चर्यचकित झालो, असंही खोपर यांनी सांगितलं

4

'मार्मिक'मध्ये राज याचं व्यंगचित्र छापून येत असल्यापासून त्यांना फॉलो करत असल्याचं अमिताभ बच्चन यांनी भेटीदरम्यान अमित ठाकरेंना सांगितलं.

5

मात्र अमित ठाकरेंना सुखद धक्का तर दुसऱ्या दिवशी बसला. कारण महानायकाने चक्क त्यांचं लकी मनगटी घड्याळ अमित यांना रिटर्न गिफ्ट म्हणून दिलं होतं. फ्लोरोसंट ग्रीन रंगाचं हे घड्याळ अमिताभ काही वर्षांपासून वापरत आहेत. अनेक कार्यक्रमातही अमिताभ यांच्या मनगटावर हे घड्याळ दिसतं. फ्लोरोसंट ग्रीन रंगाचं हे घड्याळ बच्चन यांचं स्टाईल स्टेटमेंट बनलं होतं. खुद्द बिग बी यांच्याकडून घड्याळ गिफ्ट मिळल्यापासून अमित ठाकरेंनी ते हातातून काढलं नसल्याचं त्यांच्या मित्रांनी सांगितलं.

6

अमिताभ यांना स्केच भेट देण्यासाठी अमित यांच्यासोबत मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकरही 'जलसा' बंगल्यावर गेले होते. या भेटीविषयी बोलताना खोपकर म्हणाले की, अमिताभ बच्चन यांच्यासोबत आम्ही सुमारे दोन तास घालवले. राज ठाकरे यांनी स्वत: अमिताभ यांचं चित्र रेखाटलं आहे. बिग बींनी आम्हाला त्यांचं वाचनालय दाखवलं. राज ठाकरेंनी रेखाटलेल्या चित्रांचा आणि व्यंगचित्रांचा त्यांच्याकडे खजिनाच होता, हे पाहून आम्हाला धक्का बसला.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • अमित ठाकरेंना बिग बींकडून मौल्यवान रिटर्न गिफ्ट!
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.