राज ठाकरे 'मातोश्री'वर, भेटीमागचं गुपित काय?
२३ नोव्हेंबर २००८ मध्ये राज ठाकरे बाळासाहेबांची पुस्तकं परत करण्याच्या निमित्ताने मातोश्रीवर दाखल झाले होते. त्यावेळी उद्धव आणि राज यांची भेट झाली होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयापूर्वी 2012 मध्ये सुमारे साडेतीन वर्षांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली होती. या भेटीचं निमित्त होतं उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीचं. राज ठाकरे यांनी कुटुंबासह उद्धव ठाकरे यांची लिलावती रुग्णालयात भेट घेतली होती. छातीत दुखू लागल्याने उद्धव ठाकरेंना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यामुळे प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी राज यांनी पत्नीसह उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर राज-उद्धव यांच्या भेटीची ही त्यावेळची केवळ दुसरी भेट होती.
दरम्यान, यापूर्वी शिवसेनेच्या लोकसभेतल्या यशाबद्दल राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंचं मातोश्रीवर पुष्पगुच्छ पाठवून अभिनंदन केलं होतं. महाराष्ट्रात शिवसेनेचे 18 खासदार निवडून आल्यामुळे राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना पुष्पगुच्छ पाठवला होता.
नुकताच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस झाला. 27 जुलैला शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंचा वाढदिवस जल्लोषात साजरा केला. त्यानंतर राज यांनी आज मातोश्रीवर हजेरी लावली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान ‘मातोश्री’वर हजेरी लावली आहे. राज ठाकरे यांनी ‘मातोश्री’ भेट का दिली, याचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -