मनाला भुरळ घालणारा कोकणातला पाऊस!
कोकणात पावसाच्या सरी
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनिसर्गानं कोकणावर मुक्त हस्तानं उधळण केली आहे. त्यामुळे पावसाळ्यात कोकण आणखीनच मनमोहक वाटतं
भात हे कोकणातील प्रमुख पीक आहे. त्यामुळे पावसाची सुरुवात होताच भाताच्या शेतीसाठी नांगरणी केली जाते.
पावसाची चाहूल लागताच कोकणातला बळीराजा शेतीच्या कामाला लागतो.
कोकणात दरवर्षी मुसळधार पाऊस कोसळतो. त्यामुळे संपूर्ण कोकणात सगळीच हिरवळ पाहायला मिळते.
रत्नागिरीतील राजापूर, लांजामध्येही पावसाने सकाळपासून हजेरी लावली. त्यामुळे हवेत गारवाही निर्माण झाला आहे.
सिंधुदुर्गाच्या वेंगुर्लामध्ये हजेरी लावल्यानंतर राज्यात मान्सूनचा प्रवास सुरू झाल्याची माहिती पुणे वेधशाळेने दिली आहे.
जिल्ह्यातील सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ले भागात आज सकाळपासून पावसाच्या रिमझिम सरी बरसत आहेत.
मान्सूनने तळकोकणात वर्दी लावल्यामुळे सिंदुधुर्ग जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -