गेल्या 24 तासात मुंबईतील पावसाची आकडेवारी
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईतल्या पावसामुळं हिंदमाता, दादर, परेल, कुर्ला परिसरात पाणी भरलं आहे.
मुंबईतील लोकल रेल्वे विस्कळीत झाल्यामुळे मुंबईतल्या डबेवाल्यांची सेवाही आज बंद राहणार आहे.
अनेक ठिकाणी रात्रीपासून वीजपुरवठाही खंडित करण्यात आला आहे.
मुंबई शहर-उपनगरासह ठाणे, कल्याण आणि वसई-विरार परिसरात पावसाची संततधार सुरुच आहे.
वसई-विरारमध्ये पावसाचा जोर वाढला आहे.
वांद्रे लिकिंग रोड, एसव्ही रोड, जेव्हीएलआर (जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड)वर काही ठिकाणी पाणी साचल्याची माहिती आहे.
हाजी अली जंक्शन, पेडर रोड, वांद्रे-वरळी सी लिंकवरही वाहतूक सुरळीत आहे.
वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे आणि इस्टर्न फ्री वे वरील वाहतूक सुरळीत असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी ट्विटरवर दिली आहे.
मुंबईतल्या पावसामुळे हिंदमाता, दादर, परेल, कुर्ला परिसरात पाणी भरलं आहे. त्याचप्रमाणे वांद्रे, अंधेरी भागातही पाणी साचायला सुरुवात झाली आहे.
मुंबई विमानतळावरून भारतातल्या इतर ठिकाणी उड्डाण घेणाऱ्या दुपारी 12 वाजपर्यंतच्या 34 फ्लाईट्स रद्द करण्यात आल्या आहेत. तर 14 फ्लाईट्स उशिरानं आहेत.
मुंबईत पडणाऱ्या पावसामुळं एकूण 74 विमान उड्डाणांवर परिणाम झाला आहे
हवामान विभागानं येत्या २४ तासात मुंबईत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
अतिवृष्टीच्या शक्यतेमुळे स्वतः शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी याबाबतची घोषणा केली.
जोरदार पावसामुळं आज मुंबई आणि उपनगरातल्या सर्व शाळा बंद राहणार आहेत.
प्रचंड पावसामुळे मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिटं उशिरानं सुरू असल्याची माहिती मिळतेय.
मात्र, आता पुन्हा एकदा दक्षिण मुंबईत जोरदार पाऊस बरसण्यास सुरुवात झाली आहे.
मुंबईत काल दुपारी दोनपासून सुरु झालेला पावसानं आता थोडीशी विश्रांती घेतली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -