मराठवाड्यात वरुणराजाचं पुनरागमन, नांदेडमध्ये दमदार पाऊस
एबीपी माझा वेब टीम | 14 Sep 2016 06:13 PM (IST)
1
2
3
4
5
6
7
8
9
बीडमध्येही पावसाची संततधार लागली आहे. रात्रभरापासून सुरु झालेल्या पावसाने आता सकाळच्या सुमारास जोर धरला आहे. पावसाने पाठ फिरवल्यानंतर शेतकरी हवालदिल झाला होता. पावसाच्या पुनरागमनाने नागरिकांना तूर्तास दिलासा मिळाला आहे.
10
लातूर, उस्मानाबाद, परभणी, नांदेड या जिल्ह्यांमध्ये पावसाचं पुनरागमन झालं आहे. रात्री 11 वाजल्यापासून पावसाच्या धारा सुरु आहेत. काही ठिकाणी सकाळी मध्यम स्वरुपाचा पाऊस पाहायला मिळाला.
11
गेले काही दिवस ओढ दिलेल्या पावसाने मराठवाड्यात पुनरागमन केलं आहे. मंगळवारी रात्रीपासून मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावली आहे. नांदेड शहरात आज दमदार पावसाने हजेरी लावली.