राहुल गांधींची इफ्तार पार्टी, विरोधी पक्षातील नेत्यांची पाठ
एबीपी माझा वेब टीम | 13 Jun 2018 10:54 PM (IST)
1
काँग्रेसने बुधवारी दिल्लीत इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं.
2
आपल्याला या इफ्तार पार्टीला उपस्थित राहणं जमणार नसल्याचं समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी अगोदरच स्पष्ट केलं होतं.
3
माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यासह काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली.
4
दरम्यान, रशियाचे राजदूत या पार्टीला उपस्थित होते.
5
काँग्रेसकडून विरोधकांची एकजूट बांधण्याचं काम सध्या सुरु आहे. विरोधी पक्षातील अनेक नेत्यांना या पार्टीचं निमंत्रण होतं. मात्र बऱ्याच नेत्यांनी या पार्टीकडे पाठ फिरवल्याचं दिसून आलं.
6
या पार्टीला माजी राष्ट्रपाती प्रतिभा ताई पाटील आणि प्रणव मुखर्जी यांनीही हजेरी लावली.
7
माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारीही पार्टीला हजर होते.