रहाणेचा मागील 8 कसोटी मालिकांत अनोखा विक्रम
अर्जुन पुरस्कार 2016:अंजिक्य रहाणे (क्रिकेट)
श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराच्या शेवटच्या कसोटीत रहाणेने अविस्मरणीय शतक लगावलं.
बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत रहाणेने 98 धावा केल्या.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2014-15 मध्ये रहाणेने शतकी खेळी उभारली.
न्यूझीलंडनंतर इंग्लंडविरुद्धच्या कसोटीतही रहाणेने शानदार शतक झळकावलं.
रहाणेने 2013-14 साली न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीत शतक झळकावलं.
रहाणेने दक्षिण अफ्रिके विरुद्धच्या कसोटीत 96 धावांची खेळी केली होती. त्यानंतर रहाणेची घोडदौड सुरुच आहे.
भारताची साल 2013-14 पासून आतापर्यंतची ही आठवी कसोटी आहे.
रहाणेने या शतकासह अनोखा विक्रम नावावर केला. रहाणेने मागील 8 कसोटींमध्ये कमीत कमी 90 किंवा त्यापेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
भारतीय संघाच्या पहिल्या डावात झंझावती इनिंग खेळत अजिंक्य रहाणेने सातवं शतक झळकावलं.
भारत विरुद्ध वेस्ट इंडिजच्या जमैका कसोटीत पावसाच्या व्यत्ययानंतर पहिला डाव भारताने 500 धावांवर घोषित केला. भारतीय संघाला एकूण 304 धावांची आघाडी मिळाली आहे.