कंदील बलोचचं फेसबुक, इंस्टा अकाउंट डिलीट!

व्यक्ती हयात नसली तरीही फेसबुकच्या नियमानुसार त्याचं अकाउंट हे सुरुच राहतं. इतकंच नव्हे तर त्याचे मित्रमैत्रीण टाइमलाइनवर अनेक गोष्टी शेअर करु शकतात. मात्र एखाद्या वैध विनंतीनंतर फेसबूककडून पेज किंवा अकाउंट हटवलंही जातं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
फेसबुकवर आता कंदीलचं अकाउंट सर्च केल्यास 'माफ करा आता हे पेज उपलब्ध नाही.' अशी माहिती समोर येते

पण तिचं ट्विटर अकाउंट सुरु आहे. पाकिस्तानी सरकारनं अकाउंट बंद करण्यासाठी फेसबुकला आग्रह केला असल्याचं समजतं आहे.
सख्ख्या भावानं खून केलेल्या 26 वर्षीय मॉडेल कंदील बलोचचं फेसबूक आणि इंस्टाग्राम अकाउंट डिलीट करण्यात आलं आहे. याच सोशल मीडियातून कंदीलनं बराच धुमाकूळ घातला होता. त्यामुळेच तिच्या भावानं हत्या केल्याची चर्चा आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -