कोहली, आफ्रिदी ते मोदी, कंदील बलोचची बेधडक वक्तव्य
आशिया कपमध्ये भारताविरुद्ध पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर बलोचने शाहिद आफ्रिदीवर जोरदार हल्ला चढवला होता. अभिनेत्री कंदील बलोचने लिहिलं होतं की, मी काय बोलले होते? जोपर्यंत हा वेडा शाहिद आफ्रिदी पाकिस्तानच्या संघाचा कर्णधार असेल, तोपर्यंत काहीच होऊ शकत नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appटी ट्वेण्टी वर्ल्डकपवेळी कोलकात्यातील ईडन गार्डनवरील भारत-पाकिस्तान सामन्यात पाकिस्तान विजयी झाल्यास स्ट्रिप डान्स करण्याची घोषणा करणारी पाकिस्तानातील प्रसिद्ध अभिनेत्री कंदील बलोच प्रचंड नाराज झाली होती. भारताने पाकिस्तानचा धुव्वा उडवत ईडन गार्डनवर विजयी झेंडा रोवला. त्यामुळे अभिनेत्री कंदील बलोचने पाकिस्तानी खेळाडूंवर संतप्त होत एका व्हिडीओद्वारे नाराजी व्यक्त केली होती. पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार शाहिद आफ्रिदीला निवृत्त होण्याचा सल्ला कंदील बलोचने दिला होता. शिवाय, वकार युनूसवर तर अत्यंत जोरदार टीका केली होती.
कंदील बलुचने टीम इंडियाचा कसोटी कर्णधार विराट कोहलीवर प्रेम असल्याची जाहीर कबुली दिली होती. टी 20 विश्वचषकातील भारत विरुद्ध पाक सामन्याचा हिरो म्हणजे विराट कोहलीच्या प्रेमात बुडाल्याचं तिने ट्विटरवर म्हटलं होतं.
काही दिवसांपूर्वीच कंदीलने मुस्लिम धर्मगुरु मुफ्ती अब्दुल कवी यांच्यासोबत काढलेला सेल्फी ट्विटर, फेसबुकवर स्वतःच शेअर केला होता. त्यामुळे चांगलाच वाद रंगला होता. पाकिस्तानी मीडियात चांगलीच खळबळ उडाली होती.
सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारी पाकिस्तानी मॉडेल कंदील बलोचची हत्या झाली आहे. कंदीलचा भावानेच तिची गोळ्या घालून हत्या केल्याचं सांगण्यात येत आहे. पाकिस्तानच्या मुलतान शहरात हा थरार रंगला.
कंदील बलोच नेहमीच तिच्या बिनधास्त आणि बोल्ड वक्तव्यामुळे चर्चेत राहात होती.
कंदील बलोचने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकी दिली होती. एका व्हिडीओच्या माध्यमातून धमकी देत चहावरुन मोदींची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला होता. तसंच पाकिस्तानशी घाबरुन राहण्याचा सल्लाही तिने मोदींना दिला होता.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -