नोटाबंदी आणि पुणेरी पाट्या
नोटबंदीच्या निर्णयानंतर व्हॉट्स अॅप, फेसबुक असेल किंवा ट्विटरसारख्या सोशल मीडियावर जोक्सचा आक्षरशः भडीमार सुरु आहे. सोशल मीडियावरील हेच जोक आता पुण्यातील चौकाचौकांमध्ये 'पुणेरी पाट्या' म्हणून दिसू लागल्या आहेत.
पुण्याचा मध्यवर्ती भाग असलेल्या पेठांमध्ये, चौकांत किंवा बस स्टॉपवरती सर्वत्र या पाट्या पाहायला मिळत आहेत.
पुण्यात कालपर्यंत चर्चा होती ती नोटबंदीची, पण आता चर्चा सुरु आहे ती नोटबंदीच्या निर्णयावर. खास पुणेरी पद्धतीनं टोमणा मारणाऱ्या पाट्या सर्वत्र दिसत आहेत.
पुण्यातील सदाशीव, नारायण, शनिवार,कसबा, रविवार, सर्वच पेठांमध्ये या पुणेरी पाट्या लोकांचं लक्ष वेधून घेत आहेत. या पाट्या अशा खुबीनं लावण्यात आल्या आहेत की रस्त्याने जाणाऱ्या कोणाच्याही चटकन नजरेस पडाव्यात.
पाट्यांवरचा मजकूर तीन प्रकारचा आहे आणि तिन्ही प्रकारच्या पाट्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्णयाची अगदी पुणेरी पद्धतीनं खिल्ली उडवण्यात आली आहे.