कोणत्या नगरपालिकेवर कोणाचा नगराध्यक्ष?
एबीपी माझा वेब टीम | 15 Dec 2016 03:38 PM (IST)
1
सासवडमध्ये शिवसेनेच्या विजय शिवतारेंना धक्का बसला आहे. सासवडची सत्ता जनमत आघाडीनं मिळवली आहे. 15 ठिकाणी जनमत आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर शिवसेना लोकल मित्र जन सेवा आघाडीला फक्त 4 जागा मिळवता आल्या आहेत.
2
बारामतीचा गड अपेक्षेप्रमाणं अजित पवार यांनी राखला आहे. 39 जागांपैकी 35 जागांवर विजय मिळवत राष्ट्रवादीच्या पौर्णिमा तावडे या नगराध्यक्षपदी निवडून आल्या आहेत
3
दौंडमध्ये 24 पैकी 15 जागा राष्ट्रवादीनं जिंकल्या आहेत. मात्र दौंडच्या नगराध्यक्षपदी नागरिक हित आघाडीच्या शितल कटारिया विजयी झाल्या आहेत.
4
तळेगाव, लोणावळा आणि आळंदी पालिकेच्या नगराध्यक्षपदी भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत. तसंच आळंदीत एकूण 18 जागापैकी 11 जागा जिंकत भाजपनं आळंदीवर आपली सत्ता काबीज केली