जगातील या देशांध्ये वेश्या व्यवसाय आहे कायदेशीर
वेश्या व्यवसायवर चर्चा सुरु केली की अनेकजण त्यातून अंग काढून घेतात. मात्र, या व्यवसायाने संपूर्ण जग व्यापले आहे. हा व्यवसाय भारतासोबतच अनेक देशामध्ये कायदेशीर आहे हे तुम्हाला माहिती आहे का?
तुम्हाला हे वाचून अश्चर्य वाटेल की, भारतात वेश्या व्यवसाय कायदेशीर आहे. मात्र, त्यासाठी दलाली करणे किंवा सार्वजानिक ठिकाणी वेश्या व्यवसायासाठी ग्राहकांना आकृष्ट करणे कायद्याने गुन्हा आहे.
ग्रीसमध्येही वेश्या व्यवसाय कायदेशीर आहे. पण यासाठी सेक्स वर्कर्सना आपले रजिस्ट्रेशन करावे लागते. यानंतर त्यांना एक आयडी कार्डही दिले जाते.
ऑस्ट्रियामध्ये वेश्या व्यवसाय हा पूर्णपणे लीगल आहे. यासाठी १९ वर्ष वय असणे बंधनकारक आहे. तसेच सेक्स वर्क्सना वेळोवी आपली वैद्यकीय चाचणी करून घ्यावी लागते.
नेदरलँड संपूर्ण जगात रेड लाईट एरियासाठी प्रसिद्ध आहे. नेदरलँडची राजधानी एम्स्टर्डममधील रेड लाईट एरियाला पाहायला पर्यटक गर्दी करतात.
जर्मनीमध्ये शरीर विक्रीसंदर्भात कडक कायदे आहेत. पण तरीही इथे शरीर विक्री हा व्यवसाय लीगल आहे.