पक्षाबाहेर राहूनही प्रियांका गांधी राजकारणात पॉवरफुल
2012 मध्ये प्रियांका गांधींनी रायबरेली आणि अमेठीमध्ये विधानसभा निवडणुकीवेळी प्रचार केला होता. प्रियांका गांधी बॉर्न लीडर असल्याचं काही जाणकारांचं मत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या रायबरेली आणि अमेठी या लोकसभा मतदारसंघात प्रियांकांनी अनेकदा प्रचार केला आहे. लोकांवरही त्यांची वेगळी छाप पडायची. त्या कायमच गरीब आणि महिलांमध्ये रमतात.
प्रियांका गांधी कोणत्याही पदाशिवाय पडद्यामागे काँग्रेससाठी काम करत होत्या. निवडणुकीत काँग्रेसच्या प्रचारात महत्त्वाची भूमिका बजावत होत्या. तसंच महत्त्वाच्या रणनीतीही आखत होत्या.
प्रियांका स्वत: आपलं काम निवडतात आणि ते योग्यरित्या पूर्णही करतात, असं काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांनी एकदा म्हटलं होतं. मात्र काँग्रेसने कायमच प्रियांका गांधींच्या राजकारणातील प्रवेशाचा इन्कार केला होता.
प्रियांका गांधी यांना काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस बनवलं असून लोकसभा निवडणूक 2019 ची जबाबदारीही देण्यात आली आहे. यासोबतच प्रियांका गांधींनी अधिकृतरित्या सक्रिय राजकारणात प्रवेश केला आहे. पण तरीही 47 वर्षीय प्रियांका गांधींचं राजकारणात वजन होतं.
2018 मध्ये काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांनी प्रियांका गांधींना 'गेम चेंजर' म्हटलं होतं. 2019 च्या निवडणुकीत प्रियांका महत्त्वाची भूमिका बजावतील, असं त्यांनी म्हटलं होतं. तेव्हा प्रियाकां गांधी पक्षांतर्गत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असल्याचं काँग्रेसने मान्य केलं होतं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -