पृथ्वी शॉचं एक शतक, अनेक विक्रम खिशात!
पृथ्वी शॉचं वय हे 18 वर्षे 329 दिवस आहे. 9 नोव्हेंबर 1999 रोजी जन्मलेला पृथ्वी शॉ हा पदार्पणाच्या कसोटीत शतक ठोकणारा भारताचा सर्वात युवा क्रिकेटपटू ठरला आहे. त्याच्याआधी सचिन तेंडुलकरने हा पराक्रम गाजवला होता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपृथ्वी शॉ हा पदार्पणाच्या कसोटीत शतक ठोकणारा जगातील चौथा सर्वात युवा क्रिकेटपटू ठरला आहे. बांगलादेशचा मोहम्मद अश्रफूल हा जगातील सर्वात युवा क्रिकेटपटू आहे ज्याने पदार्पणात, वयाच्या 17 वर्ष 65 व्या दिनी शतक झळकावलं होतं.
या शतकासह पृथ्वी शॉने अनेक विक्रम मोडीत काढले. पृथ्वी शॉने रणजी चषक, दुलीप करंडक आणि कसोटी या सर्वप्रकारच्या क्रिकेटमधील पदार्पणाच्या सामन्यात शतकं ठोकली आहेत.
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पदार्पणात शतक ठोकणारा पृथ्वी शॉ हा पंधरावा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्यानं 99 चेंडूंत 15 चौकारांच्या सहाय्यानं आपलं शतक साजरं केलं.
त्यानंतर झिम्बाब्वेचा हॅमिल्टन मस्क्दझाने 17 वर्ष 354 व्या दिवशी शतक, पाकच्या सलिम मलिकने 18 वर्षे 328 व्या दिनी शतक झळकावलं होतं. त्यानंतर आता 18 वर्षे 329 दिवस वयाचा पृथ्वी शॉचा नंबर लागला आहे.
मुंबईच्या पृथ्वी शॉनं राजकोट कसोटीतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खणखणीत शतकी पदार्पण केलं. अवघ्या 18 वर्षाच्या पृथ्वीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या आणि पदार्पणाच्या कसोटीतच शतक झळकावलं. विंडीज गोलंदाजांनी पृथ्वी शॉच्या फलंदाजीसमोर अक्षरश: प्रदक्षिणा घातली. फिरकी असो की वेगवान गोलंदाज पृथ्वी शॉने विंडीज गोलंदाजांवर तुफान हल्ला चढवत शतक झळकावलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -