✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

नव्या आयफोनच्या लाँचिंगनंतर जुन्या आयफोनच्या किंमतीत भरघोस कपात

एबीपी माझा वेब टीम   |  13 Sep 2017 05:18 PM (IST)
1

आयफोन 8 आणि आयफोन 8 प्लस : 29 सप्टेंबरला हे दोन्ही फोन भारतात लाँच होतील. आयफोन 8 च्या 64GB मॉडेलची किंमत 64 हजार रुपये असेल. तर या फोनच्या 256GB मॉडेलची किंमत 77 हजार रुपये असेल. आयफोनचं बेस मॉडेल यावेळी 64GB चं आहे. त्यामुळे या दोन्ही फोनच्या किंमतीची सुरुवात 64 हजार रुपयांपासून होईल.

2

आयफोन SE : आयफोन SE च्या 32GB मॉडेलची किंमत 26 हजार रुपये, तर या फोनच्या 128GB मॉडेलची किंमत 35 हजार रुपये आहे.

3

आयफोन X : अॅपलच्या या सर्वात स्पेशल फोनची किंमत 1 लाखांपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. भारतात या फोनच्या 256GB मॉडेलची किंमत 1 लाख 2 हजार रुपये असण्याची शक्यता आहे. तर या फोनची सुरुवात 89 हजार रुपयांपासून होईल. 3 नोव्हेंबरपासून हा फोन भारतात उपलब्ध होईल.

4

आयफोन 6S : आयफोन 6S च्या 32GB मॉडेलची किंमत 40 हजार रुपये, तर आयफोन 6S प्लसच्या 32GB मॉडेलची किंमत 49 हजार रुपये असेल. आयफोन 6S च्या 128GB मॉडेलची किंमत 49 हजार रुपये, तर आयफोन 6S प्लसच्या 128GB मॉडेलची किंमत 58 हजार रुपये असेल.

5

आयफोन 7 आणि आयफोन 7 प्लस : आयफोन 7 प्लसचं 256GB व्हेरिएंट कंपनीने भारतात विक्रीसाठी बंद केलं आहे. आयफोन 7 च्या 32GB मॉडेलची किंमत 49 हजार रुपये, तर आयफोन 7 प्लसच्या 32GB मॉडेलची किंमत 59 हजार रुपये करण्यात आली आहे. तर आयफोन 7 च्या 128GB मॉडेलची किंमत 58 हजार रुपये आणि आयफोन 7 प्लसच्या 128GB मॉडेलची किंमत 68 हजार रुपये आहे.

6

मुंबई : अॅपलने आयफोन 8, आयफोन 8 प्लस आणि आयफोन X च्या लाँचिंगनंतर आयफोन 7 सह इतर फोन्सच्या किंमतींमध्ये मोठी कपात केली आहे. आयफोन 7 सीरिजमध्ये अॅपलने 7 हजार 200 रुपयांची कपात केली आहे.

7

जुन्या आयफोन्सपैकी आता आयफोन 7 सीरिज, आयफोन 6S आणि SE एवढेच फोन बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असतील. मंगळवारी आयफोन 8, आयफोन 8 प्लस आणि आयफोन X हे तीन फोन लाँच करण्यात आले. त्यानंतर कंपनीने आता वेबसाईटवर जुने फोन अपडेटेड किंमतीसह लिस्ट केले आहेत.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • नव्या आयफोनच्या लाँचिंगनंतर जुन्या आयफोनच्या किंमतीत भरघोस कपात
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.