अहं, यायला लागतंय....कोल्हापुरी स्टाईलने मराठा मोर्चाचं आमंत्रण
दुसरीकडे पोलिसांनीही चोख बंदोबस्तासाठी कंबर कसली आहे.
मोर्चाचा मार्ग तसेच पार्किंगची ठिकाणं सोशल मीडियावरुन नागरिकांना कळवण्यात आली आहेत.
दरम्यान, कोल्हापुरातील मराठा क्रांती मोर्चाच्या आयोजकांनी मोर्चाची जोरदार तयारी केली आहे.
या फ्लेक्ससोबतच विविध समाजांच्या समर्थनाचे फ्लेक्सही कोल्हापुरात झळकत आहेत.
हे फ्लेक्स सोशल मीडियातही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे.
कोल्हापुरातील फ्लेक्सची सध्या महाराष्ट्रभर चांगलीच चर्चा सुरु आहेत.
मोर्चाला याला लागतंय, अहं!! या नाही यायचंच अशी वाक्यं वाहनांवर, टी-शर्टवर, डिजिटल बोर्डवर दिसत आहेत.
शहरात कोल्हापुरी स्टाईलने बॅनर लागले आहेत. यात कोल्हापुरी बाण्यात मोर्चात सहभागी होण्यासाठी आमत्रंण दिलं आहे.
: मराठा क्रांती मोर्चाचा सैलाब उद्या कोल्हापुरात धडकणार आहे.
शहरात ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या फ्लेक्सवरुन याचा प्रत्यय येतो.
15 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या मोर्चाची कोल्हापूरकरांनी अस्सल रांगड्या पद्धतीने तयारी केली आहे.