दहशतवादी हल्ल्यासंदर्भात फवाद खानची पहिली प्रतिक्रिया
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appफवादच्या टिप्पणीच्या एक दिवसआधी शफकत अमानत अलीने उरी हल्ल्याचा निषेध केला. या मुद्द्यावर बॉलिवूडमध्ये मतमतांतर आहे. सलमान खान, करण जोहर, हन्सल मेहता आणि अनुराग कश्यप यांनी पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्याच्या निर्णयाचा विरोध केला. तर अक्षय कुमार, अजय देवगण, नाना पाटेकर, रणदीप हुडा, सोनाली बेंद्र यांनी बंदीला पाठिंबा दर्शवला आहे.
फवाद खानचा 'ए दिल एर मुश्किल' याच महिन्यात दिवाळीला प्रदर्शित होणार आहे. मात्र उरी हल्ल्यानंतर मनसेने फवाद खान, माहिरा खान, अली जाफर, आतिफ असलम यांच्यावर निशाणा साधून त्यांना 48 तासात भारत सोडण्याचं अल्टिमेटम दिलं होतं.
मी माझ्या चाहत्यांचे, पाकिस्तान आणि भारतातील सहकलाकारांचे तर जगभरातील लोकांचे आभार मानतो, ज्यांनी प्रेम आणि विभागलेल्या जगात एकतेला महत्त्व दिलं, असंही फवाद खानने सांगितलं.
तो म्हणाला की, मी या प्रकरणात पहिल्यांचा बोलत आहे. माझ्या नावाने सध्या जे काही पसरत आहे, तर ते चुकीचं आहे. कारण मी याबाबत काहीही बोललो नाही.
तसंच भारतविरोधीत कथित टिप्पणीच्या वृत्ताचा त्याने इन्कार केला. मी या प्रकरणात पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत असल्याचंही त्याने सांगितलं.
मीडिया आणि जगभरातील शुभचिंतकांनी माझ्याकडे काही दिवसांपूर्वी झालेल्या दु:खद घटनेवर प्रतिक्रिया मागितली होती, असंही फवाद म्हणाला. फवादने फेसबुकवर लिहिलं आहे की, दोन मुलांचा वडील असल्याने मी इतर लोकांप्रमाणेच शांतातप्रिय जगासाठी प्रार्थना करतो. आपल्या मुलांच्या भविष्यासाठी ही आपली जबाबदारी आहे.
34 वर्षी फवाद खान म्हणाला की, कोणाच्या धमकीमुळे मी जुलैमध्ये भारत सोडलेला नाही, तर माझी पत्नी सदफ प्रेग्नंट होती आणि मला तिच्यासोबत राहायचं होतं.
बॉलिवूडमध्ये पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्याबाबत झालेल्या वादानंतर अभिनेता फवाद खानने यावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. दोन मुलांचा वडील असल्याने मी शांतातप्रिय जगासाठी प्रार्थना करतो, असं फवाद खान म्हणाला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -