शतकी कमबॅकसह युवराजची अनेक विक्रमांना गवसणी
एकूण 14 शतकांपैकी युवराजचं हे इग्लंडविरुद्धचं चौथं शतक आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयुवराजने वन डेमध्ये स्वतःचाच विक्रम मोडत 150 धावांची सर्वोच्च खेळी केली. यापूर्वी त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 139 धावा केल्या होत्या.
तब्बल 3 वर्षांनतर संघात पुनरागमन करणाऱ्या युवीने वन डेत जवळपास 7 वर्षांनंतर शतक केलं. त्याने शेवटचं शतक वेस्ट इंडिजविरुद्ध 2011 च्या विश्वचषकामध्ये केलं होतं.
युवराजने संघ संकटात असताना 150 धावांची वादळी खेळी करत जुन्या स्टाईलमध्ये फटकेबाजी करुन चाहत्यांची मनं जिंकली.
धोनीसोबत चौथ्या विकेटसाठी 200 धावांची विक्रमी भागीदारी रचत युवीने कारकीर्दीतलं 14 वं शतक ठोकत कमबॅक केलं.
कटकमधील दुसऱ्या वन डेत टीम इंडियाला सुरुवातीच्या झटक्यांनंतर युवराज सिंह आणि महेंद्र सिंह धोनी यांनी सावरलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -