300 किमी दूर मारा करणारी लढाऊ पाणबुडी 'कलवरी' नौदलाच्या ताफ्यात
ही पाणबुडी आधुनिक यंत्रणेनं सुसज्ज आहे. शत्रूच्या पाणबुडीनं हल्ला केल्यानंतर त्याला तात्काळ उत्तर देण्याची क्षमता या पाणबुडीत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appही पाणबुडी अगदी अचूक पद्धतीनं आपल्या टार्गेटवर निशाणा साधू शकते. तब्बल 300 किमी दूर मारा करण्याची क्षमता या पाणबुडीमध्ये आहे.
खोल समुद्रात या पाणबुडीची 120 दिवस चाचणी घेण्यात आली असून वेगवेगळ्या पद्धतीनं मारा करणाऱ्या हत्यांरांची चाचणी घेण्यात आली आहे.
या पाणबुडीची खासियत म्हणजे ही अजिबात आवाज करत नाही. तिचा आकार हायड्रो-डायनामिक आहे. तसेच यामध्ये घातक हत्यारंही बसवण्यात आली आहे.
1967 साली पहिली पाणबुडी आयएनएस कलवरी ही नौदलात दाखल झाली होती. जी 31 मे 1996 रोजी निवृत्त करण्यात आली होती. या पाणबुडीचे कमांडिंग ऑफिसर केएस सुब्रमण्यम हे होते.
लढाऊ आयएनएस कलवरी ही डझेल-इलेक्ट्रिक पाणबुडी आहे. 1,564 टन वजनाची ही पाणबुडी माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडनं तयार केली आहे. ही स्कॉर्पियन दर्जाची पाणबुडी आहे.
या कार्यक्रमाला संरक्षणमंत्री निर्मला सीतारामण, संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नौदलप्रमुख सुनिल लांबा हे उपस्थित होते.
मुंबई डॉकयार्डवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ही पाणबुडी नौदलाकडे सुपूर्द करण्यात आली. (फोटो सौजन्य : एएनआय)
कलवरी ही स्कॉर्पियन श्रेणीतली उच्च अशा दर्जाची पाणबुडी असल्यानं देशाच्या नौदलाची ताकद मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. देशाच्या सागरी सुरक्षेला मोठी मदत ही कलवरी पाणबुडी देणार आहे. (फोटो सौजन्य : एएनआय)
संपूर्ण भारतीय बनावटीची ‘कलवरी’ ही पाणबुडी आज भारतीय नौदलात दाखल झाली आहे. मुंबईतल्या माजगाव डॉकयार्डवर पंतप्रधान मोदी आणि संरक्षणमंत्री निर्मला सीतारामण यांच्या हस्ते कलवरी पाणबुडी देशसेवेत रुजू झाली. (फोटो सौजन्य : एएनआय)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -