PHOTO : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
15. 2013 च्या वेगाने देशात सर्वत्र शौचालयं पोहोचवायला एक शतक लागलं असतं, सर्व गावात वीज पोहचवायला आणखी दोन दशके लागली असती - नरेंद्र मोदी
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App14. आमच्या सरकारने शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव, वन रँक वन पेन्शन, ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा दिला - नरेंद्र मोदी
13. जगभरातील अर्थतज्ज्ञांकड़ून भारतीय अर्थव्यवस्थेचं कौतुक होतं आहे, छोटी गावं, शहरांमध्ये स्टार्टअपला सुरुवात झाली आहे - नरेंद्र मोदी
12. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेलं संविधान आमच्यासाठी मार्गदर्शक, गरिबांना न्याय मिळावा, दलित, आदिवासींना विकासाचा अधिकार संविधानाने दिला - नरेंद्र मोदी
11. अंतराळामध्ये मानवयान पाठवणारा भारत हा जगातला चौथा देश ठरेल. 2022 मध्ये स्वातंत्र्यदिनाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त भारतीय बनावटीच्या यानातून भारतीय अंतराळवीर अंतराळाची सफर करु शकेल - नरेंद्र मोदी
10. एका आंतरराष्ट्रीय संस्थेच्या अहवालानुसार देशातील पाच कोटी जनता गेल्या दोन वर्षांत गरिबीरेषेतून वर आले आहेत - नरेंद्र मोदी
9. कृषीप्रधान देशातील शेतकऱ्यांच्या हितासाठी दीडपट हमीभाव देण्याचा निर्णय आम्ही घेतला. शेतकऱ्यांचे हित जपणारे हे सरकार आहे. 75 व्या स्वातंत्र्यदिनापूर्वी शेतकऱ्यांना दुपटीने भाव मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत - नरेंद्र मोदी
8. स्वातंत्र्यानंतरचं देशातलं हे पहिलं मंत्रिमंडळ आहे, ज्यात महिलांना सर्वाधिक स्थान आहे. देशात पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टात तीन महिला न्यायमूर्ती - नरेंद्र मोदी
7. महात्मा गांधीजींनी सत्याग्रही तयार केले, त्यांच्या आगामी जयंतीदिनी आपण देशाला स्वच्छ करण्यासाठी स्वच्छाग्रही बनवू. आमच्या स्वच्छ भारत अभियानाची अनेकांनी खिल्ली उडवली, पण WHO च्या अहवालात याच अभियानामुळे 3 लाख मुलांचा जीव वाचल्याचं नमूद - नरेंद्र मोदी
6. येत्या 25 सप्टेंबरला पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीला पंतप्रधान जनआरोग्य योजना सुरु करणार, 10 कोटी कुटुंबांना (50 कोटी लोक) 5 लाख रुपयांचा आरोग्य विमा मिळणार. सामान्य नागरिकांना गंभीर मेडिकल उपचारांची चिंता जाणवणार नाही - पंतप्रधान मोदी
5. सरकारी अनुदान, सरकारी योजनांचा गैरफायदा घेणाऱ्या सहा कोटी बोगस लोकांचं जाळं आम्ही उद्ध्वस्त केलं. यामधून देशाच्या तिजोरीतले 90 हजार कोटी रुपये वाचले - नरेंद्र मोदी
4. प्रामाणिक करदात्यांचा देशाच्या विकासात मोठा वाटा, या करदात्यांमुळेच देशासाठी, गरिबांसाठी अनेक योजना राबवणं शक्य. आज देशात पावणे सात कोटी लोकं कर भरतात. 2013 पर्यंत हा आकडा 4 कोटी होता. परंतु या 4 वर्षात हा आकडा दुपटीने वाढला आहे - नरेंद्र मोदी
3. तिहेरी तलाकमुळे अनेक महिलांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं, आम्ही कायदा करतोय, पण त्याला काहीजण विरोध करत आहेत. मात्र मुस्लीम महिलांना मी आश्वस्त करतो, आम्ही तो कायदा करणारच - नरेंद्र मोदी
2. न गाली से न गोली से, कश्मीर की समस्या सुलझेगी गले लगाने से, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुनरुच्चार - पंतप्रधान मोदी
1. सैन्य असो, निमलष्करी दल असो, आपलं पोलिस दल असो किंवा आपल्या गुप्तचर यंत्रणा असो, त्यांच्या एकजुटीमुळे देशाला अंतर्गत सुरक्षा दिली आहे - नरेंद्र मोदी
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -