मोदी आणि ट्रम्प यांच्या भेटीचे काही खास फोटो
यावेळी मोदींनी स्वागताबद्दल ट्रम्प आणि त्यांच्या पत्नीचे आभार मानले, तर डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदी महान असल्याचा उल्लेख केला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appव्हाईट हाऊसमध्ये पार पडलेल्या या बैठकीत दहशतवाद या प्रमुख मुद्यावर एकमत झाले. दोन्ही देश एकत्र येउन दहशतवाद संपवू असे विधान डोनाल्ड ट्रम्प यांनी केले.
मोदींनी ट्रम्प यांना भारतात सहपरिवार येण्याचं निमंत्रण दिलं आहे.
या भेटीनंतर ट्रम्प यांनीही आपली प्रतिक्रिया दिली. 'मोदींचं स्वागत करणं ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. ते एक महान पंतप्रधान आहेत. त्यांचं काम खूपच शानदार आहे. ज्या पद्धतीनं ते आर्थिक पातळीवर काम करत आहेत त्यासाठी त्यांचा खरंच सन्मान व्हायला हवा.'
ट्रम्प यांच्या भेटीनंतर पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'राष्ट्रपती ट्रम्प आणि त्यांच्या पत्नीनं माझं स्वागत केलं. मला दिलेला हा सन्मान हा भारतातील 125 कोटी देशवासियांचा सन्मान आहे.'
'भारत हा अमेरिकेचा खरा मित्र असून, दोन्ही देश मिळून आयसिसला संपवण्याचा प्रयत्न करु.' असेही ते म्हणाले. तसेच डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले.
द्विपक्षीय संबंध, दहशतवाद, अफगाणिस्तानातील अस्थिरता अशा अनेक मुद्यांवर यावेळी चर्चा करण्यात आली.
डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच त्यांची भेट घेतली. ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलोनिया यांनी मोदींचे स्वागत केले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -