पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णायाचे बॉलिवूडकडून समर्थन
किंग खान शाहरुखनेही या निर्णयाचे स्वागत केले आहे. शाहरुखने हा निर्णय म्हणजे, दूरदृष्टी, अधिकच स्मार्ट आणि राजकीय हेतूने प्रेरित नसल्याचे सांगितले आहे. तसेच याने भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सकारात्मक बदल नक्की येईल, हे अतिशय धाडसी पाऊल होते, असे म्हणले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्णयाचे बॉलिवूडचा दबंग खाननेही स्वागत केले आहे. सलमानने काळा पैशांच्या समस्येवर अॅक्शन घेतल्याबद्दल पंतप्रधानांना सलाम केला आहे.
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन हिने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली की, ''मी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या निर्णयाबद्दल अभिनंदन करते. हा सर्वात कठोर निर्णय असून, यामुळे भारतातून भ्रष्टाचार नष्ट करण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल आहे. या निर्णयाकडे व्यापक दृष्टीकोनातून पाहण्याची गरज आहे,'' असेही ती म्हणाली. या निर्णयावर सलमान खान, शाहरुख खान, आमीर खान, रजनीकांत, करण जोहर, अजय देवगम कपिल शर्मा आदींनीही आपली मते मांडली आहेत.
आमीर खाननेही या निर्णयाचे स्वागत केले असून, ''लोक आज ज्या समस्येचा सामना करत आहेत, ती काहीच दिवसांची गोष्ट आहे. भारतासाठी हे आवश्यक होते. जर या निर्णयामुळे माझ्या सिनेमावर परिणाम झाला तरी मला खेद वाटणार नाही.''
याशिवाय बॉलिवूड अभिनेता अजय देवगन, ऋषी कपू, सुनील शेट्टी, सोनाली बेंद्रे, सोनाली राऊत, सुनील ग्रोवर आदींनी मोदींच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
कॉमेडियन कपिल शर्मानेही या निर्णयाचे स्वागत केलं आहे. ''एटीएम सेंटरच्या बाहेर अशी लांबच लांब रांग कधी पाहिली नव्हती. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आम्हाला तुमचा गर्व आहे,'' असं म्हटलं आहे.
सिनेनिर्माता दिग्दर्शक करण जोहरनेही हा निर्णय म्हणजे मास्टर स्ट्रोक असल्याचे म्हणलं आहे. या निर्णयाने नरेंद्र मोदीं स्टेडिअमच्या बाहेरपर्यंत पोहचले आहेत. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी करण जोहरच्या ट्विटला उत्तरही दिलं आहे. पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये करण जोहर धन्यवाद. आम्हाला, आपल्या भावी पीढिसाठी एक अशा भारताची निर्णय तयार करायचा आहे. जो भ्रष्टाचारापासून मुक्त असेल. हॅशटॅग इंडिया फाइटस करप्शन
काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी कलाकारांचे समर्थन करण्यावरुन वादात सापडलेल्या अनुराग कश्यप यानेही या निर्णयाचे स्वागत केलं आहे. कश्यप म्हणाला की, ''मी आजपर्यंत कोणत्याही राजकीय नेत्याने इतके धाडसी पाऊल उचलेले पाहिले नव्हते. या निर्णयाने थोडासा त्रास होईल. पण काळ्या पैशांना निश्क्रिय करण्यासाठी हा चांगला उपक्रम आहे.''
बिग बी अमिताभ बच्चन यांनी म्हटलं आहे की, '2000च्या नव्या नोटा गुलाबी रंगात आहेत. हा पिंक सिनेमाचा प्रभाव आहे.'
सुपरस्टार रजनिकांत यांनीही ट्विटरच्या माध्यमातून या निर्णयाचे स्वागत केले आहे. नरेंद्र मोदींना सलाम, नव्या भारताचा जन्म होतोय. जय हिंद असं म्हणलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 8 नोव्हेंबर रोजी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटाबंदीचा निर्णयाची घोषणा केल्यानंतर सर्वांचीच तारांबळ उडाली. या निर्णयामुळे सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागला असला, तरी याचे अनेकांनी स्वागत केली. या निर्णयाचे बॉलिवूडमधूनही समर्थन होत असल्याचे चित्र आहे.