उरणमध्ये गुलाबी फ्लेमिंगोजचे आगमन
फ्लेमिंगोजना मान खाली घालून नाचताना आणि आकाशात भरारी घेताना पाहणं हे एक पर्वणी आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउरण येथे 700 ते 800 गुलाबी फ्लेमिंगोजचे आगमन झालं आहे. बच्चेकंपनीसह पक्षीप्रेमीची फ्लेमिंगो पाहण्यासाठी धाव.
उरण येथे हजेरी लावलेल्या या परदेशी पाहुण्यांमध्ये गुलाबी रंगाच्या मध्यम उंचीच्या फ्लेमिंगोजची संख्या अधिक आहे.
निसर्गरम्य वातावरणात या गुलाबी फ्लेमिंगोजना पाहणे ही जणू पर्वणीच बनली आहे.
रस्त्याच्या अगदी कडेला दिसणारे ह्या फ्लेमिंगोजचे फोटो काढण्यासाठी अनेक फोटोग्राफर्स येथे येतात.
उरण तालुक्यातील जेएनपीटी बंदर परिसर, पाणजे आणि डोंगरी गावादरम्यान असलेल्या पाणवठ्यामध्ये हे परदेशी पाहुणे असलेले 'फ्लेमिंगो' दरवर्षी हजेरी लावतात.
मुंबईपासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर असलेल्या उरण तालुक्याच्या पश्चिम किनारपट्टीनजीक हे 'फ्लेमिंगोज' गेल्या अनेक वर्षांपासून दिसून येतात.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -