जेजुरी गडावर पारंपारिक मर्दानी खेळ, 42 किलोंची तलवार दातांनी उचलली
42 किलो वजनी तलवार मराठा सरदार महिपतराव आणि रामराव पानसे यांनी 250 वर्षांपूर्वी अर्पण केली. तेव्हापासून दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पालखी सोहळा गडावर आला की ती उचलली जाते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतब्बल 42 किलोंची तलवार एका हातात जास्तीत जास्त वेळ पेलून धरण्याची आणि दातात उचलून मर्दानी खेळ दाखवण्याची स्पर्धा या ठिकाणी रंगते.
पालखी सोहळा जेजुरी गडावर आल्यावर मर्दानी खेळाची स्पर्धा रंगते. 12 वर्षांपासून ते 60 वर्षे वयोगटातील भक्त या स्पर्धेत उत्साहाने सहभागी होतात.
महाराष्ट्राचं लोकदैवत असणाऱ्या खंडेरायाच्या जेजुरी दरवर्षी पारंपारिक पद्धतीने ‘मर्दानी दसऱ्याचं’ आयोजन करण्यात येतं. तब्बल 15 तासांपेक्षाही जास्त काळ हा सोहळा गडावर संपन्न झाला. (सर्व फोटो : विजयकुमार हरिश्चंद्रे)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -