✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

एलफिन्स्टन चेंगराचेंगरी : हृदय पिळवटून टाकणारी दृश्य

एबीपी माझा वेब टीम   |  29 Sep 2017 07:29 PM (IST)
1

त्यामुळे एका वर्षापूर्वीच या पुलाचा प्रश्न मार्गी लागला असता, तर ही दुर्घटना टाळता आली नसती का, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे

2

ज्या पुलावर ही दुर्घटना घडली, त्या पुलासंदर्भात शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी एका वर्षापूर्वीच पत्र लिहिलं होतं. मात्र तत्कालिन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी निधी नसल्याचं कारण दिलं होतं.

3

यामुळे केईएम रुग्णालयाकडून रक्तदात्यांचे आभार व्यक्त करण्यात आले. त्याचप्रमाणे हॉस्पिटलजवळ गर्दी न करण्याचंही आवाहन करण्यात आलं.

4

केईएम रुग्णालयाला जखमींवर उपचारासाठी रक्ताची आवश्यकता निर्माण झाली होती. A पॉझिटिव्ह , A निगेटिव्ह, AB पॉझिटिव्ह आणि AB निगेटिव्ह रक्तगटातील दात्यांची गरज होती, मात्र मुंबईकरांच्या तत्परतेमुळे अवघ्या दोन तासांतच रुग्णालयाला रक्ताचा आवश्यक तितका पुरवठा उपलब्ध झाला.

5

दुर्घटनेनंतर जखमी झालेल्या प्रवाशांना इतरांनी तातडीने मदत केली. जखमी आणि मृतांना मिळेल त्या वाहनांमधून जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र केईएममध्ये दाखल करेपर्यंत 15 प्रवाशांनी प्राण सोडला होता. तर काही जणांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला.

6

अग्निशमन दलाचे जवान, महानगरपालिकेचे अधिकारी आणि पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आहे.

7

त्यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीमुळे श्वास गुदमरुन आणि चिरडून 22 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मृतांमध्ये 14 पुरुष, तर आठ महिलांचा समावेश आहे. सुमारे 39 जण जखमी असून त्यांच्यावर परळमधील केईएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. जखमींमध्ये 30 पुरुष आणि 9 महिलांचा समावेश आहे.

8

आज सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास फूट ओव्हर ब्रिजवरील पत्रा कोसळल्याची ओरड झाली. यामुळे ब्रिजवरील प्रवाशांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं. त्यातच ब्रिज पडत असल्याच्या आणि शॉर्ट सर्किट झाल्याच्या अफवा पसरल्या. त्यामुळे ब्रिजवरील प्रवाशांमध्ये एकच हलकल्लोळ माजला.

9

मुंबईतील एल्फिन्स्टन आणि परेल रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या पुलावर मोठी चेंगराचेंगरी झाली. या घटनेत 22 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 39 प्रवासी जखमी झाले आहेत.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • एलफिन्स्टन चेंगराचेंगरी : हृदय पिळवटून टाकणारी दृश्य
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.