PHOTO | सोशल डिस्टन्सिंगसाठी केरळचा 'छत्री पॅटर्न' पुण्यात
महिलांनी घरोघरी जाऊन छत्री वापरण्याचं आवाहन केलं, यातूनच 'सेल्फी विथ अम्ब्रेला'चे स्टेटसही झळकू लागलेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलॉकडाऊन चारमध्ये सरकारने शिथिलता आणली. त्यामुळेच नॉन रेड झोनमधील गावांप्रमाणेच पुण्यातील मंचरची बाजारपेठ सुरु झाली.
नथीचा नखरा, नऊवारी साडी, ब्लॅक गॉगल हे सुरु असलेले ट्रेंड आणि त्याला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेत 'सेल्फी विथ अम्ब्रेला' ची हाक देण्यात आली.
हळूहळू महिला छत्री घेऊनच घराबाहेर पडू लागल्या. यामुळे सोशल डिस्टंसिंग राखला जाऊ लागला आणि उन्हापासूनही बचाव होऊ लागला.
मात्र पाऊस नसताना छत्री वापरायची म्हणजे चेष्टा होणार. त्यामुळे या संकल्पनेला घेऊन अनेकांनी नाकं मुरडली.
या गर्दीवर तोडगा काढण्यासाठी केरळचा छत्री पॅटर्न राबवायचं एक सर्वांना मान्य केलं.
केरळच्या धर्तीवर गांजळेंनी गावात 'छत्री पॅटर्न' राबवायचं ठरवलं. महिलांनी ही कल्पना डोक्यावर घेतली.
लॉकडाऊन 4 मध्ये शिथिलता आल्याने सोशल डिस्टंसिंगचा पुरता फज्जा उडाला. यावर मंचरचे सरपंच दत्ता गांजाळेंनी एक शक्कल लढवली.
पुण्याचं मंचर हे नॉन रेड झोनमध्ये येत असल्याने येथील बहुतांश दुकानांनी कामाचा श्रीगणेशा केला. नागरिकांनी ही दुकानाबाहेर खरेदीसाठी गर्दी केली.
बघता-बघता अबाल-वृद्धांपासून सर्वांच्याच स्टेटसवर छत्रीसोबतचे फोटो झळकू लागले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -