अमृतसरमध्ये मृत्यूतांडव, रेल्वे अपघातात 61 जणांचा मृत्यू
कार्यक्रम सुरु असतानाच अचानक रेल्वे आली आणि रुळावर उभे असलेल्या लोकांना उडवलं. मृतांचा आकडा मोठा असण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या अपघातावर पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी दुःख व्यक्त केलं आहे. सर्व खाजगी आणि सरकारी रुग्णालयांना जखमींच्या मदतीसाठी तत्पर राहण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. शिवाय सर्व सरकारी यंत्रणाही मदतकार्याला लागली आहे.
अपघात नेमका कसा झाला याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण उत्सवाच्या वेळीच एक मोठी दुर्घटना घडली आहे.
रेल्वे रुळावर उभं राहून लोक रावण दहनाचा कार्यक्रम पाहत होते, अशी माहिती आहे. जालंधरहून अमृतसरला जाणाऱ्या ट्रेनने या लोकांना उडवलं. अमृतसरच्या जोडा फाटकजवळ हा रावण दहनाचा कार्यक्रम साजरा केला जात होता. दरम्यान, एकाचवेळी दोन्ही बाजूंनी आलेल्या ट्रेनने लोकांना उडवलं, असंही बोललं जात आहे.
पंजाबमधील अमृतसरमध्ये भीषण अपघात झालाय. रावण दहनाचा कार्यक्रम पाहत असलेल्या लोकांवर ट्रेन चढली, ज्यामध्ये 61 जण मृत्यूमुखी पडले आहेत. तर 70 पेक्षा अधिक जण गंभीर जखमी झालेत. तब्बल 200 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. यामध्ये वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना पंजाब सरकार आणि केंद्र सरकारकडून अर्थसहाय्य जाहीर करण्यात आलं आहे.
काँग्रेसचे आमदार नवज्योत सिंह सिद्धू यांच्या मतदारसंघातला हा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाला सिद्धूंच्या पत्नीही उपस्थित होत्या. कार्यक्रम साजरा केला जात असलेल्या ठिकाणी बाजूलाच रेल्वे रुळ आहे. रेल्वे रुळावर आणि बाजूलाही लोक उभे होते