फ्रान्सच्या नीस हल्ल्याचे सुन्न करणारे फोटो
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसुरुवातीला हा अपघात असल्याचं म्हटलं जात होतं. पण अपघात नसून हा हल्ला असल्याचं एका अधिकाऱ्याने सांगितलं. चालकाने गर्दीमध्ये ट्रक घुसवल्यानंतर गोळीबारही केला. यानंतर सगळीकडे मृतदेहांचे खच पडले होते. (सर्व फोटो ट्विटर)
या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी ट्रक चालकाला तात्काळ गोळ्या घालून ठार केलं. (सर्व फोटो ट्विटर)
फ्रेन्च मीडियानुसार, कुख्यात अतिरेकी संघटना आयएसआयएसने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. मात्र हल्ल्यातील आणखी एका संशयिताने पळ काढल्याचं म्हटलं जात आहे. (सर्व फोटो ट्विटर)
फ्रान्समध्ये 14 जुलै हा बॅस्टिल डे म्हणजेच राष्ट्रीय दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने समुद्रकिनाऱ्यावर फटाक्यांची आतषबाजी पाहण्यासाठी हजारो लोक जमा झाले होते. त्याचवेळी हा ट्रक घुसला. (सर्व फोटो ट्विटर)
ट्रकचालक अरेबिक भाषेतून बोलत होता, असं काही स्थानिकांनी सांगितलं. सध्या कोणालाही ओलिस ठेवलेलं नाही. शिवाय दहशतवादीविरोधी पथक या प्रकरणाचा तसाप करत आहे. (सर्व फोटो ट्विटर)
फ्रान्सच्या नीस शहरात दहशतवादी हल्ला झाला. राष्ट्रीय दिनाच्या सोहळ्यासाठी जमलेल्या गर्दीत एक ट्रक घुसला. यात तब्बल 77 जणांना चिरडून मृत्यू झाला आहे. तर 150 हून अधिक जखमी आहेत. (सर्व फोटो ट्विटर)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -