'विरानुष्का'च्या दिल्लीतील ग्रँण्ड रिसेप्शनचे खास फोटो
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नाचा रिसेप्शन सोहळा दिल्लीत पार पडला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या रिसेप्शनला हजेरी लावली होती.
विराट आणि अनुष्काने पंतप्रधान मोदींना रिसेप्शनला येण्यासाठी निमंत्रण दिलं होतं. विराट-अनुष्काच्या निमंत्रणाला मान देत मोदींनी या कार्यक्रमाला हजेरी लावली आणि दोघांनाही लग्नाच्या शुभेच्छा दिल्या.
पाच जानेवारीपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळवण्यात येणार आहे. तर अनुष्काही शुटिंगला सुरुवात करणार आहे.
या कार्यक्रमानंतर विराट कोहली नव्या वर्षात दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे.
या रिसेप्शनला बॉलिवूडमधील आणि क्रिकेटमधील दिग्गज हजर होते..
21 तारखेला म्हणजे आज दिल्लीत, तर 26 तारखेला मुंबईत जंगी रिसेप्शन होणार आहे.
लग्नाचा कार्यक्रम हा अत्यंत खाजगी पद्धतीने करण्यात आला असला तरी भारतात रिसेप्शनचा मोठा कार्यक्रम आयोजित करण्याता आला आहे.
क्रिकेट आणि बॉलिवूडमधील अनेक दिग्गजही या कार्यक्रमाला उपस्थित होते.