उत्तर भारतात जोरदार बर्फवृष्टी; परिसरात बर्फाची चादर, पर्यटक खुश
परिसरातील घरे, डोंगरावर बर्फांची सफेद चादर दिसत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपर्यटकांची गर्दीही याठिकाणी पाहायला मिळत आहे. देशभरातील पर्यटक बर्फवृष्टीचा आनंद घेताना दिसत आहेत.
हवामान विभागच्या अंदाजानुसार गुरुवारपर्यंत अधिक बर्फवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मनालीमध्ये किमान तापमान 2.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
लाहौल-स्पिती, चंबा, कुल्लू, किन्नौर आणि शिमला या जिल्ह्यांमध्ये डोंगराळ भागात गेली तीन दिवस बर्फवृष्टी सुरु आहे.
शिमल्यात 0 ते 0.5 सेल्सिअस अंश तापमानाची नोंद झाली आहे. परिसरात 20 सेमीहून अधिक बर्फवृष्टी झाली आहे. कुफरी आणि मशोबरा परिसरात 40 सेमीहून अधिक बर्फवृष्टीची नोंद झाली आहे.
कुफरी आणि नरकंडामध्ये जोरदार बर्फवृष्टी झालेली पाहायला मिळाली. त्यामुळे पर्यटनस्थळांवर गर्दी पाहायला मिळत आहे.
शिमला आणि आजूबाजूच्या परिसरात रात्रभर बर्फवृष्टी झाली आहे.
हिमाचल प्रदेशची राजधानी शिमाल्यामध्ये बुधवारी मोसमातील सर्वाधिक बर्फवृष्टी झाली आहे. रस्तांचा संपर्कही तुटला आहे.
हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी सुरु आहे. बर्फवृष्टीमुळे परिसरात बर्फाची चादर पसरली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -