Photo | रो-रो सेवा आता मुंबई आणि अलिबागकरांसाठीही वरदान
अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई | 14 Feb 2020 06:54 PM (IST)
1
महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड कडून हे काम करण्यात आले आहे.
2
मुंबई पासून अलिबाग आणि मांडवा इथे जाण्यासाठी रस्ते वाहतुकीने गेल्यास किमान 4 ते 5 तास लागतात.
3
या बोटीसाठी भाऊचा धक्का, अलिबाग आणि मांडवा इथे जेट्टी टर्मिनल देखील बांधण्यात आले आहेत.
4
केंद्र सरकारच्या सागरमाला प्रकल्पाअंतर्गत ही रोरो सेवा सुरू करण्यात येत आहे.
5
गोवा, कोकणमध्ये जाणाऱ्या चारचाकी वाहन चालकांना ही बोट अतिशय उपयुक्त ठरेल. त्याचा वेळ तर वाचेल सोबत डिझेल पेट्रोल देखील कमी खर्च होईल.
6
सध्या याच जलमार्गाने फेरी बोट सुरू आहेत मात्र त्यात कमी प्रवासी आणि दुचाकी वाहानेच जाऊ शकतात. मात्र या बोटीत एका वेळी 500 प्रवासी घेऊन जाण्याची क्षमता यात आहे. तर 180 चारचाकी वाहने देखील जाऊ शकतील.
7
या बोटीने मात्र भाऊचा धक्का ते अलिबाग किंवा मांडवा केवळ एका तासात जाता येईल.