मुंबईतील मेट्रो-3चं काम वेगात
एबीपी माझा वेब टीम | 24 Sep 2018 09:10 PM (IST)
1
33.5 किमीची मेट्रो-3 ही देशातील पहिली भुयारी मेट्रो असणार आहे.
2
मुंबईतील कुलाबा-बांद्रा-सिप्झ या मेट्रो-3नं आपल्या कामाचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केला आहे.
3
भुयारी करणाच्या या कामात आज 1.26 किलोमीटरचा टप्पा पूर्ण करण्यात आला. वैनगंगा-1 या टनेल बोअरिंग मशिननं 259 दिवसांत हे अंतर यशस्वीरित्या पूर्ण केलं.
4
मरोळ पाली ग्राऊंड ते इंटरनँशनल एअरपोर्ट या मार्गावर भुयारीकरणाच्या कामाचा पहिला टप्पा आज यशस्वीपणे पूर्ण करण्यात आला आहे.
5
राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मेट्रो-3च्या कामाला वेगानं सुरुवात झाली आहे.
6
भुयार खोदणारं वैनगंगा-1 नावाचं टनेल बोअरिंग मशिन चालवून दाखवण्यात आलं.
7
मेट्रो-3च्या पॅकेज 7 मधील भुयारीकरणाच्या पहिल्या टप्प्याच्या कामाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं.